शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकासह पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:22 IST

चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़.

ठळक मुद्देजुन्या ५०० व एक हजारांच्या २० हजार नोटा जप्तसंगनमनेरच्या नगरसेवकासह पाच जणांना अटक 

पुणे : चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़.  त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़.गजेंद्र बजाबा अभंग (वय ४७, रा़ संगमनेर, बी़ एड़ कॉलेज रोड, संगमनेर), विजय अभिमन्यू शिंदे (वय३८, रा़ वाकडेवाडी, संभाजीनगर, खडकी), अदित्य विश्वास चव्हाण (वय२५, रा़ भुगाव रोड, ता़ मुळशी), सुरेश पांडुरंग जगताप (वय ४०, रा़ खराडेवाडी, ता़ फलटण, जि़ सातारा) आणि नवनाथ काशिनाथ भंडागळे (वय २८, रा़ कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.

               याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, वैभव पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी काही जण येणार आहे़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोहोमकर, माळी, बारवकर, केकाण, नदाफ, क्षीरसागर, माळवदकर यांनी रविवारी पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ सापळा रचला़ रात्री साडेअकराच्या सुमारास  काही जण आले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्यातील दोघांकडील बॅगेत चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या १००ची १९ बंडले आणि एक हजार रुपयांच्या नोटांच्या १००ची १६० बंडले मिळून आली़ . 

               त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या नोटा बदलून देण्यासाठी एक जण येणार होता़ त्यांची आम्ही वाट पहात होतो़  अशी माहिती मिळाली. खडक पोलिस अधिक तपास करीत आहेत़. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये या नोटा रद्द करण्याची घोषणा केली होती़ त्या बदलून घेण्यासाठी डिसेंबरअखेर मुदत देण्यात आली होती़ या घटनेला आता काही महिन्यातच दोन वर्षे होतील, असे असताना लोकांनाकडे बाद झालेल्या इतक्या नोटा असल्याचे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत़.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाDemonetisationनिश्चलनीकरणArrestअटक