शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाला बोलावले नसल्याचा राग धरून पाच जणांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:33 IST

वाढदिवसाला बोलावले नसल्याचा राग मनात धरून काटी (ता. इंदापूर) येथे पाच जणांना तलवारी, सत्तूर, लोखंडी पाईप, काठ्यांनी बेदम मारल्याच्या आरोपावरून दहा जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

इंदापूर - वाढदिवसाला बोलावले नसल्याचा राग मनात धरून काटी (ता. इंदापूर) येथे पाच जणांना तलवारी, सत्तूर, लोखंडी पाईप, काठ्यांनी बेदम मारल्याच्या आरोपावरून दहा जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.हेमंत अशोक वाघमोडे, सचिन अशोक वाघमोडे, रवी दिलीप मासाळ, स्वप्निल सुनील मासाळ, सुनील चंद्रकांत सोलनकर, सूर्या सुनील मासाळ, गणेश बाळासाहेब सोलनकर (सर्व रा. काटी, ता. इंदापूर), समीर वाकसे (रा. खोरोची, ता. इंदापूर), किरण मारकड (रा. कौठळी, ता. इंदापूर), विकास देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. उमेश प्रदीप वाघमोडे (वय २४, रा. काटी, ता. इंदापूर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास काटी गावातील सतीश भोसले याच्या घरासमोर व गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर मारहाण झाली. फिर्यादी उमेश वाघमोडे, त्याचे चुलते नवनाथ विठोबा वाघमोडे, गिरीश दिनकर वाघमोडे, किसन दशरथ वाघमोडे, राजकुमार महादेव वाघमोडे हे मारहाणीत जखमी झाले आहेत.पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी उमेश हा सतीश भोसलेयाची दुचाकी देण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्या वेळी स्वीफ्टडिझायर गाडी (एमएच ४२/३०३३) व स्कार्पियो गाडी (एमएच ४२/ एएच १६१३)मधून आलेल्या आरोपींनी ‘विक्रम धनाजी बुट्टे यांच्या वाढदिवसाला का बोलावले नाहीस?’ अशी विचारणा करून ‘आत्ता तुम्हा एकेकाला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी देऊन तलवारी, सत्तूर, लोखंडी पाईप, काठ्यांनी फिर्यादीवर हल्ला चढवला.हा प्रकार पाहिल्यानंतर फिर्यादीचे चुलते नवनाथ विठोबा वाघमोडे, गिरीश दिनकर वाघमोडे त्याला सोडवण्यासाठी तेथे आले. त्यांनाही आरोपींनी मारहाणकेली. फिर्यादी घायाळ होऊन जमिनीवर पडल्यानंतर मरणपावला, असे समजून आरोपी तेथून निघून गेले. गावातील डॉ. आंबेडकर कमानीजवळ आरोपींनी किसन दशरथ वाघमोडे, राजकुमार महादेव वाघमोडे यांनाही बेदम मारहाणकेली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. फौजदार डी. एस. कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे