शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 10:54 IST

शिस्तीच्या बडग्यामुळे तुरुंगाधिकाऱ्यांवर केला होता गोळीबार

पुणे : कारागृहात शिस्तीचा बडगा दाखवल्याने संतापलेल्या आरोपींनी संगनमत करुन तुरुंगाधिकारी मोहन पाटील यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. निलेश संभाजी वाडकर, सुदर्शन संभाजी राक्षे, ओंकार चंद्रकांत बेनूसे, ऋषीकेश राजेश चव्हाण, आणि कुणाल कानडे अशी त्यांची नावे आहेत.शिस्तप्रिय असलेले मोहन पाटील हे कारागृहात काम करत असताना अतिशय कडक वागत असत. निलेश वाडकर व त्याच्या साथीदारांची एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यावेळी पाटील यांच्या शिस्तीचा बडगा त्यांना सहन करावा लागला होता. त्या रागावून त्यांनी पाटील यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. जामीनावर सुटून बाहेर आल्यावर त्यांनी पाटील हे कधी ये-जा करतात, याची रेकी करुन कट रचला. नेहमीप्रमाणे पाटील शुक्रवारी सकाळी जेल ओपनिंग ड्युटीसाठी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी भर रस्त्यात त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांचा नेम चुकल्याने ते थोडक्यात बचावले. पाटील यांनी हातातील छत्रीच्या सहाय्याने  प्रतिकार केल्याने दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या पार्किंगसमोर हा प्रकार घडला.या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. हल्ला करणारे दोघे हल्लेखोर स्कूटरवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक पुंगळी आढळली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.   

टॅग्स :yerwada jailयेरवडा जेलFiringगोळीबारCrimeगुन्हाPuneपुणे