शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एक हजार खेळाडूंना दरवर्षी देणार पाच लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 00:25 IST

केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड : ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०१९’चे शानदार उद््घाटन

पुणे : देशातील खेळाडूंना तसेच क्रीडा सुविधांसाठी यापुढे भरभरून आथिक साह्य करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खेलो इंडिया यूथ गेम्स २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी पुण्यात जाहीर केले. याअंतर्गत देशातील एक हजार खेळाडूंना प्रत्येकी ५ लाख रूपये पुढील ८ वर्षांसाठी देण्याची घोषणा क्रीडामंत्र्यांनी केली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील राज्य शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन स्टेडियममध्ये या स्पर्धेचे उद्घाटन राजवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते थाटात झाले. या वेळी ते म्हणाले, ‘‘देशातील एक हजार प्रतिभावान खेळाडूंना भरभरून आर्थिक साह्य करण्यात येईल. या स्पर्धेत शानदार कामगिरी करणारे खेळाडू आगामी काळात आपली क्षमता उंचावून देशाला आॅलिम्पिक पदके जिंकून देतील, असा विश्वास मला आहे.’’ यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सरसंचालिका नीलम कपूर, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, चेअरमन राजेंद्र सिंग, नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, महापौर मुक्ता टिळक यांसह स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू, क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.औरंगाबादमध्ये उभारणार राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठराज्यात अनेक वर्षांपासून क्रीडा विद्यापीठाचे भिजत घोंगडे पडून आहे. खेलो इंडिया’चे दुसरे सत्र यंदात महाराष्ट्रात होत असल्याचे मुहुर्त साधून मुख्यमंत्रम्यांनी राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये उभारण्याची महत्वपूर्ण घोषणा उद्घाटनादरम्यान केली.खेळांचे स्टेडियम उभारण्याकरीता यापूर्वी तालुकास्तरावर १ कोटी रुपये दिले जात होते, ते आता ५ कोटी रुपये देणार आहोत. जिल्हा स्तरावर ८ कोटी रुपये देत होतो, त्यात दुपटीने वाढ करून आता १६ कोटी रुपये देण्यात येतील. विभागस्तरावर स्टेडियम उभारण्यासाठी पूर्वी २४ कोटी रुपये देण्यात यायचे.ही रक्कम आता वाढवून ४५ कोटी रुपये इतकी देण्यात येणार आहे. खेळांची मैदाने तयार करुन महाराष्ट्र देखील देश आणि जगाला चांगले खेळाडू देऊ शकेल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

उद््घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील परंपरिक लोककलांचे सादरीकरण झाले. या समारंभासाठी राज्यातील अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच ज्येष्ठ आॅलिंपिकपटूंना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील शिववंदना सादर करण्यात आली. याद्वारे शिवकालीन इतिहास उलगडून दाखविण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने स्टेडियम दुमदुमून गेले. खेळाडू, प्रशिक्षक व अन्य पदाधिकारी मिळून १० हजार लोकांचा सहभाग स्पर्धेमध्ये असणार आहे. महोत्सवासाठी विविध राज्यांच्या खेळाडूंचे आगमन झाल्यामुळे क्रीडानगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा महोत्सवात ३६ राज्यांतील ६ हजार खेळाडू, १ हजार ८०० तांत्रिक अधिकारी, १ हजारहून अधिक संघटक आणि ७५० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणे