वाहतूक शाखेचे पाच कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: March 19, 2015 00:22 IST2015-03-19T00:22:39+5:302015-03-19T00:22:39+5:30
पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांना अनेक महिने, दिवस गैरहजर असल्याच्या किंवा लाचखोरीमुळे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

वाहतूक शाखेचे पाच कर्मचारी निलंबित
पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांना अनेक महिने, दिवस गैरहजर असल्याच्या किंवा लाचखोरीमुळे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या आॅगस्टपासून शिपाई अमोल डेरे गैरहजर असून, पोलीस नाईक नितीन जाचक डिसेंबरपासून, शिपाई दीपक जगताप फेब्रुवारीच्या मध्यापासून सेवेवर हजर झालेले नाहीत. हे तिघेही वाहतूक नियंत्रण शाखेत नेमणुकीस होते. कोरेगाव पार्क ठाण्यांतर्गत नेमणुकीस असलेला हवालदार संभाजी चौधर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कारवाई केल्याने त्यास निलंबित करण्यात आले आहे. स्वारगेट ठाण्यात नियुक्त असलेल्या व जानेवारीपासून आजारपणाच्या रजेवर असलेल्या सतीश जाधव या हवालदारासही निलंबनास सामोरे जावे लागले आहे. (प्रतिनिधी)