शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘आरएसएस’ची मंगळवारपासून पाचदिवसीय चिंतन बैठक, सरसंघचालकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 20:36 IST

बैठकीमध्ये केवळ संघकार्य, विस्तार, हिंदुत्व यांंसह समाजात सध्या घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा केली जाणार आहे.

ठळक मुद्देदलित अत्याचाराच्या घटनांवरही होणार मंथनआगामी निवडणुकांवर चर्चा नाही

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची पाचदिवसीय चिंतन बैठक मंगळवार (दि.१७) पासून मुळशी तालुक्यातील कोळवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्यांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे.संघाचे अखिल भारतीय सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार उपस्थित होते. वैद्य म्हणाले, दि. १७ ते २१ एप्रिल या कालावधीत ही बैठक होत आहे. बैठकीमध्ये केवळ संघकार्य, विस्तार, हिंदुत्व यांंसह समाजात सध्या घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा केली जाणार आहे. आगामी निवडणुकांवर कसलीही चर्चा होणार नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले नाही. सरसंघचालक या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, प्रवीण तोगडिया यांचा उमेदवार पराभुत झाल्याने त्यांनी विश्व हिंदू परिषद सोडली आहे. मात्र, तरीही संघाचा त्यांच्याशी नियमितपणे संपर्क राहील, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. दलित अत्याचार आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनांबाबत बोलताना वैद्य म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन काही विघटनकारी शक्ती समाजात जातीभेदाच्या भिंती उभ्या करत आहेत. डॉ.आंबेडकरांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी काम केले. त्यांचे विचार भेदाची भिंत उभी करणारे नव्हते. संघही तेच करत आहे. जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आंबेडकरांचे खरे अनुयायी असू शकत नाहीत. ----------------------------

टॅग्स :PuneपुणेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत