उष्माघाताने युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 20, 2016 00:50 IST2016-04-20T00:50:39+5:302016-04-20T00:50:39+5:30

सणसर (ता. इंदापूर) येथील युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. हा युवक सोमवारी (दि. १८) श्री क्षेत्र शिंगणापूर येथे कावड घेऊन गेला होता.

Fissure death | उष्माघाताने युवकाचा मृत्यू

उष्माघाताने युवकाचा मृत्यू

भवानीनगर : सणसर (ता. इंदापूर) येथील युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. हा युवक सोमवारी (दि. १८) श्री क्षेत्र शिंगणापूर येथे कावड घेऊन गेला होता. गहिनीनाथ उत्तम चव्हाण (वय ३०) असे त्याचे नाव आहे.
येथून दरवर्षी मानाची ज्ञानेश्वरमहाराज चव्हाण यांची कावड श्री क्षेत्र शिंगणापूर येथे जाते. सोमवारी (ता. १८) शिंगणापूर येथील डोंगरावरील अवघड कडा चढल्यानंतर कावड दुपारी वर पोचली. दुपारी गहिनीनाथने तहान लागल्याने थंड पाणी मागितले. मात्र, पाणी पिल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली. उपचारासाठी त्याला दवाखान्यात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री सणसर ग्रामस्थंना घटनेची माहिती समजली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. रात्रीच अनेक ग्रामस्थ शिंगणापूरला पोहोचले. मंगळवारी (दि. १९) सकाळी दहा वाजता त्याच्यावर सणसर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Fissure death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.