शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमाराने दाखविले प्रसंगावधान; उजनीत बुडणाऱ्या दोन महिलांचे आणि लहान मुलांचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:43 IST

महिला आणि मुलांचे प्राण वाचविणाऱ्या मासेमाऱ्याच्या धाडसाचे पोलिसांसह सर्वच स्तरातून कौतुक

ठळक मुद्देसुसाट्याचा वारा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना

भिगवण : कोरोनाच्या धास्तीने सुरु असलेल्या लोंकडाऊनच्या काळात तक्रारवाडी गावातील काही महिला आणि लहान मुले उजनीकाठी फिरण्यास गेली असता फुगवट्यातील पाण्यात पोहण्यासाठी उतरली होती.मात्र सुसाट्याचा वारा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने नाकातोंडात पाणी जावून बुडत असताना किनारी असणाऱ्या मच्छिमाराने जीवाची पर्वा न करता उडी घेत सर्वांचे प्राण वाचविल्याची घटना तक्रारवाडी गावात घडली .याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नागरिकांना घरात अडकून राहावे लागत आहे.तर गावात अथवा भिगवण शहरात फिरायचे म्हटल्यावर पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागतो.त्यामुळे तक्रारवाडी गावातील नागरिक आणि महिला वनविभागाच्या टेकडीवर पाय मोकळे करण्यासाठी जात असतात.तर काही उजनी धरणाच्या पाणी फुगवट्यावर जात पोहण्याच्या आनंद लुटत असतात.याचप्रकारे तक्रारवाडी गावातील काही महिला आपल्या लहानग्यांना घेवून उजनी किनारी फेरफटका मारीत होते.  यातील काही लहानगी आणि महिला पोहण्यासाठी पाण्यात उतरली होती. याचवेळी सुटलेल्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोन लहान मुळे पाण्यात गटांगळ्या खावू लागली.याची जाणीव होताच यातील एका महिलेने दोन मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत दुसरी महिला मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात बुडू लागल्याने सर्वांच्या जीविताला धोका निर्माण झाला.

याच वेळी किनार्यावर मासेमारी साठी जाणाऱ्या राजू नंदू परदेशी याच्या हा अघटीत प्रकार दिसून आल्याने त्याने प्रसंगावधान दाखवीत तातडीने आपल्या जीवाची पर्वा न करता उडी घेत सर्वांना सहीसलामत किनारी आणले.परदेशी याने दाखविलेल्या धाडसामुळे दोन महिला आणि तीन लहानग्याचे प्राण वाचले. त्यामुळे नागरिकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी महिला आणि मुलांचे प्राण वाचविणाऱ्या राजू परदेशी या मासेमाराचे पोलीस ठाण्यात बोलावून अभिनंदन केले.तसेच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना त्याच्या कार्याची माहिती देत या तरुणाचे नाव राष्ट्रपती जीवन रक्षक पदकासाठी पाठविण्याची शिफारस केली असल्याची माहिती माने यांनी दिली

टॅग्स :BhigwanभिगवणUjine Damउजनी धरणdrowningपाण्यात बुडणेPoliceपोलिस