शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्यांकडून पावणेदहा कोटी वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:19 IST

७.४ टक्क्यांनी वाढ : २ लाख ३२ हजार प्रवाशांवर कारवाई

पुणे : मध्य रेल्वे जुलै महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत २ लाख ३२ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ९ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड प्रवाशांकडून वसूल करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत फुकट्या प्रवाशांच्या संख्येत ७.४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची शोधमोहीम राबविली जाते. मागील वर्षी जुलै महिन्यात २ लाख १६ हजार प्रवाशांना पकडण्यात आले होते. विनातिकीट प्रवास करणे, संपूर्ण प्रवासाचे तिकीट नसणे तसेच विनातिकीट माल नेणे अशा प्रवाशांचा त्यामध्ये समावेश आहे. यावर्षीच्या मोहिमेत २ लाख ३२ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी त्यामध्ये ७.४ टक्क्यांची वाढ झाली असून उत्पन्नही ६.११ टक्क्यांनी वाढले आहे.एप्रिल ते जुलै या चार महिन्यात एकूण १३ लाख १७ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६९ कोटी ७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी फुकट्या प्रवाशांची संख्या सुमारे १२ लाख एवढी होती. विनातिकीट प्रवाशांप्रमाणेच दुसºयांच्या आरक्षित तिकिटावर प्रवास करणाºया २०२ प्रवाशांवर जुलै महिन्यात कारवाई करण्यात आली. त्यांना १ लाख ८५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वे