पुणे : पत्नीने दुसरे लग्न केल्याचे समजल्यावर रागाच्या भरात पहिल्या पतीनेच तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे़. समर्थ पोलिसांनी एरोल अलफ्रेडो अंताओ (रा़ गोवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ही घटना २०१६ ते १३ आॅगस्ट २०१८ दरम्यान घडली आहे़.याबाबत पोलिसांनी सांगितले की, या पती- पत्नीत वादावादी होत असल्याने ते वेगवेगळे राहू लागले होते. महिला आपल्या पतीला सोडून गोव्याहून पुण्यात रहायला आली़.बराच काळ वेगळे राहू लागले होते़. काही काळाने त्यांनी घटस्फोट घेतला़. या घटस्फोटाबाबत एरोल नाराज होता़. त्यात त्याला आपल्या पहिल्या पत्नीने दुसरा विवाह केल्याची माहिती मिळाली़. त्यामुळे पत्नीला धडा शिकविण्याच्या इराद्याने पूर्वी काढलेले पती पत्नीच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ त्याने पॉर्न साईटवर अपलोड केले़. त्यावरही न थांबता त्याने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले व पहिल्या पत्नीच्या मित्र मैत्रिणीला ते अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन लिंक पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला़. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. आरोपी गोव्यात राहायला आहे़.पत्नीच्या दुसऱ्या विवाहामुळे रागाच्या भरात त्याने पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केले आहेत, असे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांनी सांगितले़.
पतीने केले पहिल्या पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 17:04 IST
पत्नीने दुसरे लग्न केल्याचे समजल्यावर रागाच्या भरात पहिल्या पतीनेच तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़.
पतीने केले पहिल्या पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल
ठळक मुद्देयाप्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद पती पत्नीच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ त्याने पॉर्न साईटवर अपलोड