शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:37 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले आहेत.महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत खुल्या गटाचा कट आॅफ १२३ गुण, अनुसूचित जाती संवर्ग १२३, अनुसूचित जमातीचा ११४, इतर मागास वर्ग (ओबीसी) १२३, विशेष मागास प्रवर्ग १२८, डीटी (ए) १२७, एनटी (बी) १२८, शारीरिक अपंग १३० असा कटआॅफ लागला आहे.सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ४३० उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेत १५६ इतके सर्वाधिक गुण मिळवून शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे, असे आयोगाच्या उपसचिव विजया पडते यांनी सांगितले. विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.डोंबिवलीकर श्रुती कानडेचे यशडोंबिवली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत (एसटीआय) डोंबिवलीतील श्रुती कानडे हिने राज्यात मुलींमध्ये (ओबीसी) प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील मेघदूत इमारतीत राहणाऱ्या श्रुतीचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यामंदिर शाळेत झाले. तिने एमएससी बायोटेकचे शिक्षण मुलुंडमधील केळकर-वझे महाविद्यालयात घेतले. विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी तिने कुठेही क्लास लावला नाही. तिला घरातूनच प्रोत्साहन मिळाले. श्री गणेश मंदिर संस्थानच्या लायब्ररीत बसून तिने अभ्यास केला. चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची आहे. अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्न करा, यश नक्कीच मिळते, असा संदेश श्रुतीने दिला आहे.तिचे वडील मनोहर हे पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत, तर भाऊ श्रीकृष्ण हा पोलीस खात्यातच कमांडोपदावर आहे. आई मीनल गृहिणी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.कल्याण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात एसटी प्रवर्गात मुलींमध्ये बदलापूर येथे राहणारी आरती रमेश चव्हाण ही चौथी आली आहे. आरती पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. आपल्या या यशात मनोहर पाटील सर तसेच आईवडील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दररोज १० तास अभ्यास केल्याने हे यश मिळाल्याचे तिने यावेळी सांगितले.