लावणी महोत्सवात ‘चांदीची घुंगरं’ प्रथम
By Admin | Updated: December 13, 2014 23:52 IST2014-12-13T23:52:12+5:302014-12-13T23:52:12+5:30
थिएटर -कलाकेंद्राने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, करवीरचे पद्मिनी कोल्हापूरकर कलाकेंद्राने द्वितीय आणि सोलापूरच्या वैशाली वाफळेकर कलाकेंद्राने तृतीय क्रमांक मिळविला.

लावणी महोत्सवात ‘चांदीची घुंगरं’ प्रथम
पुणो : पुणो लावणी महोत्सवात आर्यभूषण थिएटर -कलाकेंद्राने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, करवीरचे पद्मिनी कोल्हापूरकर कलाकेंद्राने द्वितीय आणि सोलापूरच्या वैशाली वाफळेकर कलाकेंद्राने तृतीय क्रमांक मिळविला.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात पारंपरिक आणि अस्सल बाजाच्या लावण्यांची ही स्पर्धा रंगली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या लावणी कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिरात आपली कला सादर करून पुणोकरांना पारंपरिक लावण्यांचा नजराणा पेश केला. स्पर्धेची महाअंतिम फेरी पाच संघांमध्ये चांगलीच रंगली. प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांच्या हस्ते आर्यभूषण थिएटर कला केंद्राने 2 किलो चांदीचे घुंगरू, 51 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर द्वितीय विजेती ठरलेल्या पद्मिनी कोल्हापूरकर कलाकेंद्राला 31 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, तर तिस:या क्रमांकाच्या वैशाली वाफळेकर संघाला 21 हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याशिवाय, शेखर डावाळकर (उत्कृष्ट ढोलकीवादक) यांना 15 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, तर पद्मिनी पाटील आणि पूजा वाईकर (उत्कृष्ट नृत्यांगना) व मंगला जावळे (उत्कृष्ट गायिका) यांना 5 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल आणि मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)