शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पहिले रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलन जानेवारीत; पानिपतकार विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड

By श्रीकिशन काळे | Updated: December 10, 2024 17:38 IST

संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि समारोप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे.

पुणे : मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचे औचित्य साधत मराठी भाषा वाढावी व मराठीच्या वाचन संस्कृतीचे जतन व्हावे तसेच ती प्रवाहीत रहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे जानेवारीत आयोजन करण्यात आले आहे. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे प्रांतपाल ३१३१ शितल शहा यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

शनिवार, दि. ४ आणि रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित संमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. नामवंत साहित्यिक, कवी, विचारवंत, अभ्यासक यांच्या उपस्थितीने हे संमेलन लक्षवेधी ठरणार आहे. संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि समारोप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील तसेच सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.जागतिकीकरणाच्या काळात भाषाविषयक आव्हाने, त्यावरील उपाययोजना, कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहित्य विश्वात होणारे फायदे-तोटे अशा विविध कळीच्या मुद्द्यांबद्दल ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक विचारवंतांची मते, ठोस भूमिका चर्चासत्रांच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहेत. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमासह प्रसिद्ध संगीत नाटकाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारे कविसंमेलन विशेष आकर्षण ठरेल असा विश्वास आहे. संमेलन सर्वांसाठी खुले असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे, असे संमेलनाचे संयोजक, रोटेरियन राजीव बर्वे यांनी कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarathiमराठी