शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

नीरा-भीमा कारखान्याची २१०० रुपये पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:19 IST

बँक खात्यात होणार जमा; हर्षवर्धन पाटील यांची माहिती

बावडा : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू सन २०१८-१९ चा ऊस गळीत हंगाम उत्कृष्टरीत्या चालू आहे. या हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला रु. २१०० प्रमाणे पहिली उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहाजीनगर येथे दिली.ते म्हणाले, की कारखान्याने आजअखेर २ लाख १२ हजार ७९० टन उसाचे गाळप पूर्ण करून २ लाख १५ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आजचा साखर उतारा १०.५२ टक्के असून सरासरी साखर उतारा १०.३० टक्के आहे. कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पातून आजअखेर १ कोटी १९ लाख ४६९५१ युनिट वीज एक्स्पोर्ट केली आहे. आसवनी प्रकल्पातून ३४ लाख ९८ हजार ५४६ लिटरचे उत्पादन घेण्यात आले आहे.शेटफळ हवेली तलाव लाभक्षेत्रातील गावांमधील ऊसपिकाला गेल्या मे महिन्यापासून पाणी मिळालेले नव्हते. त्यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या या सर्व उसाची कारखान्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नुकसान सहन करून लवकर तोडणी केली आहे. या उसाला कपात न करता इतर शेतकºयांप्रमाणे दर दिला जाईल. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील पाण्याअभावी जळून चाललेल्या इतर भागातील उसाची शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून प्राधान्याने तोडणी केली जाईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटील यांनी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कारखान्याशी संबंधित सर्व घटनांचे अभिनंदन केले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, अशोक वणवे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने व अधिकारी उपस्थित होते.नीरा भीमा कारखान्याचा चालू गळीत हंगामातील उसाचा अंतिम दर हा इतर कारखान्यांच्यातुलनेत निश्चितपणे अधिकचा असेल, अशी ग्वाहीही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच चालू गळीत हंगामात कारखान्याने ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकºयांनी आपला सर्व ऊस नीरा भीमा कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने