पहिली सभा अन् सदस्यांत उत्सुकता

By Admin | Updated: March 15, 2017 03:27 IST2017-03-15T03:27:41+5:302017-03-15T03:27:41+5:30

महापालिका निवडणूकीत नव्याने निवडूण आलेल्या सुमारे ऐशी नगरसेवकांनी आज प्रथमच महापालिकेत पाऊल ठेवले. पहिली महासभा आणि महापालिकेचे

First meeting and enthusiast of the members | पहिली सभा अन् सदस्यांत उत्सुकता

पहिली सभा अन् सदस्यांत उत्सुकता

पिंपरी : महापालिका निवडणूकीत नव्याने निवडूण आलेल्या सुमारे ऐशी नगरसेवकांनी आज प्रथमच महापालिकेत पाऊल ठेवले. पहिली महासभा आणि महापालिकेचे कामकाज जाणून घेण्यात सदस्यांमध्ये उत्सुकता दिसून आली.
महापौर आणि उपमहापौरपदावर निवड झाल्याचे पीठासन अधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर करताच सभागृहात भाजपाच्या सदस्यांनी बाके वाजवून व जयजयकाराच्या घोषणा दिल्या. प्रेक्षक गॅलरीतही समर्थकांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.


बैलगाडीतून मिरवणूक
महापौर निवडणुकीसाठी काळजे हे बैलगाडीतून महापालिकेत आले. बिनविरोध निवड झाल्यानंतर दुसरीकडे सभागृहाबाहेरही ढोल-ताशांच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार यांनी नूतन महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले. सर्वत्र भाजपाचे झेंडे
महापौर आणि उमहापौरपदाची निवडणूक असल्याने मोरवाडी चौकापासून महापालिका भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्य रस्त्यावर भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे महापालिका परिसर भाजपामय झाला होता.माघारीचे गौडबंगाल
महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने सुरुवातीला उमेदवार दिले आणि ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी माघारीचे गौडबंगाल काय अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीत उमेदवार देऊ नये,
अशी मागणी केली होती. ती
मान्य केल्याचे राष्ट्रवादीच्या
नेत्यांनी सांगितले.

Web Title: First meeting and enthusiast of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.