नारायणगाव येथे सतराशे जणांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:37+5:302021-09-02T04:24:37+5:30

नारायणगाव : पुणे जिल्हा परिषद आणि बजाज ग्रुप यांच्या सहकार्यातून प्राथमिक आरोग्य केंद्र व नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नारायणगाव ...

The first dose was taken by 1700 people at Narayangaon | नारायणगाव येथे सतराशे जणांनी घेतला पहिला डोस

नारायणगाव येथे सतराशे जणांनी घेतला पहिला डोस

नारायणगाव : पुणे जिल्हा परिषद आणि बजाज ग्रुप यांच्या सहकार्यातून प्राथमिक आरोग्य केंद्र व नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नारायणगाव येथे आयोजित कोविड महालसीकरण मोहिमेत सुमारे १ हजार ७८० जणांना कोविड प्रतिबंधकचा पहिला डोस देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत लसीकरण मोहीम सुरू होती, अशी माहिती नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश पाटे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश घोडे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ आदी उपस्थित होते .

सरपंच योगेश पाटे म्हणाले की, या पहिल्या टप्प्यात लसीकरण उपक्रम राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, डॉ. वर्षा गुंजाळ व प्राथमिक आरोग्य केंद्रच्या स्टाफ यांच्या सहकाऱ्याने १ हजार ७८० डोसचा उपक्रम राबविण्यात आला आहे .यापुढेही नारायणगावात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तिसरी लाट व साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी , असे आवाहन पाटे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच योगेश पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, अरिफ आत्तार, राजेश बाप्ते ,संतोष दांगट ,विकास तोडकर ,अजित वाजगे ,अर्चना माळवदकर, आकाश कानस्कर, जालिंदर खैरें, ईश्वर पाटे, किरण ताजने, अमित औटी, सुजित पवार, प्रणव वऱ्हाडी उपस्थित होते.

०१नारायणगाव

महालसीकरण मोहिमेचे उद्घाटन करताना आयुष प्रसाद समवेत आशा बुचके, योगेश पाटे व इतर.

010921\whatsapp image 2021-08-31 at 3.48.30 pm.jpeg

नारायणगाव येथे कोविड महालसीकरण मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी आशा बुचके, सरपंच योगेश पाटे  व इतर मान्यवर 

Web Title: The first dose was taken by 1700 people at Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.