वारूळवाडी येथे चौदाशे जणांना पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:58+5:302021-09-02T04:22:58+5:30
या महालसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद ...

वारूळवाडी येथे चौदाशे जणांना पहिला डोस
या महालसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, तहसीलदार हनमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश घोडे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, विस्ताराधिकारी के. बी. मोरे, तलाठी संजय सैद, वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, जंगल कोल्हे, ज्योती संते, स्नेहल कांकरिया, शुभांगी कानडे, वैशाली मेहेर, राजश्री काळे, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, सचिन वारुळे, गणेश वाजगे, अतुल आहेर, ईश्वर अडसरे, विकास फुलसुंदर, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे उपस्थित होते.
वारूळवाडी ग्रामस्थांसाठी पहिल्या टप्प्यात महालसीकरण उपक्रम राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या सहकाऱ्याने १ हजार ४०० डोसचा उपक्रम राबविण्यात आला आहे अशी माहिती वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी दिली.
३१ नारायणगाव
या वेळी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आयुष प्रसाद करताना उपस्थित असलेले आशाबुचके, राजेंद्र मेहेर, डॉ वर्षा गुंजाळ व इतर.
310821\1853-img-20210831-wa0270.jpg
वारूळवाडी येथे कोविड लसीकरण मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी आशाताई बुचके, राजेंद्र मेहेर , डॉ वर्षा गुंजाळ व मान्यवर उपस्थित होते .