शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

दलित कलावंतांचा अमेरिकेत होणार जागर!, २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:26 IST

जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत आयुष्याची चित्तरकथा रचणाऱ्या दलित साहित्यिकांनी अवघ्या महाराष्ट्रात एक धगधगते वास्तव कथा, कविता, कादंब-या, आत्मचरित्र यातून मांडले होते. त्याच साहित्याचा आणि कलेचा जागर जागतिक पातळीवर पोचला आहे.

- धनाजी कांबळेपुणे : जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत आयुष्याची चित्तरकथा रचणाऱ्या दलित साहित्यिकांनी अवघ्या महाराष्ट्रात एक धगधगते वास्तव कथा, कविता, कादंब-या, आत्मचरित्र यातून मांडले होते. त्याच साहित्याचा आणि कलेचा जागर जागतिक पातळीवर पोचला आहे. येत्या २३ आणि २४ तारखेला न्यूयॉर्कमध्ये दलित कलावंतांच्या झंझावात पहिल्या दलित चित्रपट आणि सांस्कृतिक महोत्सवात पाहायला मिळणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, आंबेडकर असोसिएशन आॅफ नॉर्थ अमेरिका, बोस्टन स्टडी ग्रुप, आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, आंबेडकर बुद्धीस्ट असोसिएशन यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोलंबिया विद्यापीठाचा वारसा हा उदारमतवादी विचारांचा आहे. याच विद्यापीठाच्या वैचारिक मानवतावादी व पुरोगामी संस्कृतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक जडणघडण झाली. तोच वैचारिक वारसा घेवूनहा महोत्सव कोलंबिया विद्यापीठ व द न्यू स्कूल, न्यूयॉर्क इथे होणार आहे, अशी माहिती सुरज ऐंगडे यांनी दिली.भारतातल्या दबलेल्या दलित समूहाचे जगणे, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सर्व पातळ्यांवर द्यावा लागणारा लढा, हे कलेच्या माध्यमातून जगासमोर आणले जाणार आहे. भारतीय व दक्षिण आशियातील मुख्य प्रवाहाशी सवांद प्रस्थापित करणे, त्याचप्रमाणे या समाजातील वैविध्य चित्रपटाच्या माध्यमातून मांडले जाईल. चित्रपटांबरोबरच यात माहितीपटांचाही समावेश आहे. दलित निर्माते आणि दिग्दर्शक यांनी दलित जीवन, त्याच्या जाणिवा, त्यातील त्यांचा वर्गलढा, जातसंघर्ष समोर ठेवून तयार केलेल्या चित्रपटांचा यात समावेश आहे.या महोत्सवात चित्रपटासह दलित कलावंतांनी निर्माण केलेली फाईन आर्ट, त्यांनी काढलेले फोटो, साहित्य ज्यामध्ये दलितांच्या जगण्यातील दाहकता, त्यांच्या आत्मसन्मानासाठी धरलेला आग्रह दाखवण्यात येणार आहे.नागराज मंजुळे यांच्यासह जाणकारांची उपस्थितीचित्रपट सृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला आहे, अशा दलित कलावंतांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक पा. रणजित, नागराज मंजुळे, अभिनेत्री निहरिका सिंग, डॉ. डेविड ब्लान्डेल, बोमकु मुरली, जयन चेरियन, सुबोध नागदिवे, रामपिला राव, तसेच चित्रपट व इतर माध्यमातील जाणकार उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Puneपुणे