लग्न समारंभामध्ये गोळीबार

By Admin | Updated: April 23, 2015 06:34 IST2015-04-23T06:34:29+5:302015-04-23T06:34:29+5:30

रावेत येथील निवृत्ती लॉनवर लग्न समारंभ सुरू असताना, मारुंजीतील रहिवासी विठ्ठल चव्हाण यांच्यावर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अज्ञात

Firing in wedding ceremony | लग्न समारंभामध्ये गोळीबार

लग्न समारंभामध्ये गोळीबार

पिंपरी : रावेत येथील निवृत्ती लॉनवर लग्न समारंभ सुरू असताना, मारुंजीतील रहिवासी विठ्ठल चव्हाण यांच्यावर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मोठा आवाज होताच, चव्हाण बाजूला झाले. त्यांना दुखापत झाली नाही. देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. गोळीबार करणारे आरोपी मात्र हाती लागले नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील एका विवाहसमारंभाचे रावेत येथे आयोजन करण्यात आले होते. मारुंजीतील बहुतांश ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. त्यांमध्ये चव्हाणसुद्धा होते. निवृत्ती लॉनजवळ दबा धरून बसलेल्या दोघा जणांनी सायंकाळी सातच्या सुमारास चव्हाण यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच आरडाओरडा झाला. चव्हाणसुद्धा सावधपणे बाजूला झाले. त्यांना दुखापत झाली नाही. गोळीबाराच्या घटनेने गोंधळ उडताच, हल्लेखोरांनी पलायन केले.
चव्हाण हे जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काम करतात.
अशाच व्यवहारातून त्यांच्यावर
हल्ला करण्याचा कोणीतरी प्रयत्न केला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Firing in wedding ceremony