शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

सराफी दुकानात गोळीबार करून कामगाराची हत्या करणारे जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:36 IST

कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील सराफी दुकानात शिरून तेथील कामगाराची गोळी घालून हत्या करणाऱ्या बिहारी टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़

पुणे : कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील सराफी दुकानात शिरून तेथील कामगाराची गोळी घालून हत्या करणाऱ्या बिहारी टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़ बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून चौघांना अटक करण्यात आली आहे़ मात्र, त्यांनी हा गोळीबार का केला याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही़कुंदन विजय सिंग (वय २३), अमित विजय सिंग (वय २०, रा. पुणे, मु. बिहार), रिशू संजय सिंग (वय २१), विकास सुरेश सिंग (१९, रा. बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रवी सिंग (२५) हा फरार झाला आहे़ २१ नोव्हेंबर रोजी शहरात एकाच दिवशी ३ गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. भरदुपारी येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्समध्ये शिरलेल्या चौघांनी कामगार अमरत परिहार यांच्यासोबत वाद घालून त्याच्यावर गोळी झाडली होती. या घटनेचे दुकानातील सीसीटीव्हीवर फुटेज मिळाले होते. मात्र, त्यांनी दुकानातील काहीही माल चोरला नव्हता़ घटनेच्या सहा दिवसांपूर्वी हडपसर येथील डी मार्ट व कोंढवा येथील इस्कॉन मंदिराजवळ ३ दिवसांपूर्वी २ दुचाकी चोरल्याचेही समोर आले आहे. घटनेनंतर त्यांनी या दोन्ही दुचाकी डोंगराच्या कडेला सोडून ते पळून गेले होते़ घटनेनंतर आरोपी रात्री रेल्वे स्थानकातून पुणे-धानापूर एक्स्प्रेसने बिहारला पळून गेले होते. सोशल मीडियावर हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर यातील आरोपींना कोेंढव्यात पाहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिमंडळ पाचचे उपायुक्त प्रकाश गायकवाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक विवेक पाडवी व पथकाने त्यांना बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून अटक केली.>दिल्लीतही एक खुनाचा गुन्हा दाखलआरोपी कुंदन व अमित हे सख्खे भाऊ आहेत. बीए आणि बीकॉमचे शिक्षण घेत आहेत. कुटुंबासोबत अनेक वर्षांपासून कोेंढव्यात राहत आहेत. वैयक्तिक वादातून खून झाला असावा अशी शक्यता आहे. फरार रवी सिंग याच्यावर दिल्लीतही एक खुनाचा गुन्हा दाखल असून, त्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.आरोपींनी अद्याप नेमका कोणत्या कारणास्तव अमरतचा खून केला, हे उघड झाले नाही. त्याबाबत चौकशी सुरू आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी कोठडीची मागणी केली. चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.