चाकण (पुणे) - चाकण एमआयडीसीत महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वराळे (ता. खेड) येथील एका स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी सकाळी १०च्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहे.
अजय सिंग (३३), असे गंभीर जखमी झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. दीपेश चव्हाण (रा. वराळे) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली,
पोटात, कमरेत गोळी पोलिसांनी सांगितले की, दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून कंपनीत आले होते. त्यांनी काम करीत असलेल्या सिंग यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी पोटात घुसली, तर दुसरी गोळी कमरेला लागली. यामध्ये सिंग गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपींचा शोध सुरु आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. खेड आणि शिक्रापूर परिसरातही नाकाबंदी केली. गोळीबार हा व्यावसायिक वादातून झाला की अन्य कारणावरून याचा शोध सुरू आहे.