शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ गोळीबार; तरुण गंभीर जखमी

By विवेक भुसे | Updated: November 20, 2023 10:06 IST

या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत....

पुणे : त्याच्यामुळे कामावरुन काढून टाकले, या गैरसमजातून झालेला वाद मिटविल्यानंतर दोघांनी तरुणावर गोळीबार करण्याची घटना बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

आकाश बाणेकर (वय २८, रा. लवळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजरात कॉलनी,कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदित्य दिपक रणावरे व सागर लक्ष्मण बनसोडे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत राऊंड जप्त केला आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेलजवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश पिंपळकर आणि रोहित ननावरे हे दोघे बाणेर येथील एका मोटार कंपनीत कामाला आहेत. कंपनीने रोहित याला कामावरुन काढून टाकले़ फिर्यादी याच्यामुळेच आपल्याला कामावरुन काढून टाकले, या गैरसमजुतीतून त्याने फिर्यादी यांना महाबळेश्वर हॉटेलजवळ बोलावून घेतले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रोहित ननावरे याच्या मित्रांनी रोहितला घरी नेऊन सोडले. फिर्यादी व आकाश बाणेकर हे तेथे बोलत थांबले असताना रोहितला सोडून आदित्य रणावरे, सागर बनसोडे तेथे आले़ त्यांच्याशी पुन्हा वाद झाला. तेव्हा आदित्य याने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यातील गोळी आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBanerबाणेरPoliceपोलिस