पिंपरीत बिल्डरवर गोळीबार

By Admin | Updated: June 25, 2017 01:02 IST2017-06-25T01:02:42+5:302017-06-25T01:02:42+5:30

पिंपळे गुरव येथे भरदिवसा योगेश शेलार या बांधकाम व्यावसायिकावर दोघांनी गोळीबार केला. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भर वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला.

Firing a builder in a pirate | पिंपरीत बिल्डरवर गोळीबार

पिंपरीत बिल्डरवर गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी (पुणे) : पिंपळे गुरव येथे भरदिवसा योगेश शेलार या बांधकाम व्यावसायिकावर दोघांनी गोळीबार केला. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भर वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला.
शेलार यांच्या पायात एक गोळी घुसली होती. हल्ल्यानंतर ते जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या पायात घुसलेली गोळी काढण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाले असून, त्यांनी हेल्मेट घातल्याचे दिसत आहे. निवडणूक कालावधीत पुणे महापालिकेच्या एका माजी नगरसेवकाच्या मुलीशी शेलार यांचा वाद झाला होता. त्यातून सुपारी देऊन हा हल्ल करण्यात आल्याचा संशय शेलार यांनी व्यक्त केला असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
—-

Web Title: Firing a builder in a pirate