शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरुन गोळीबार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 21:36 IST

मित्र, मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करत असताना शेजारच्या टेबलावरुन कॉमेंटवरुन झालेल्या वादावादीत एका तरुणाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या़.

ठळक मुद्देनातेवाईकांची हत्या झाल्याने स्वसंरक्षणासाठी आरोपीकडे रिव्हॉल्व्हरचा परवानारिव्हॉल्व्हर, २ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या पुंगळ्या जप्तपोलिसांनी गुन्हा दाखल आरोपीला केली अटक

पुणे : हॉटेलमध्ये मित्र, मैत्रिणीबरोबर फ्रेंडशिप डे साजरा करत असताना शेजारच्या टेबलावरुन कॉमेंटवरुन झालेल्या वादावादीत एका तरुणाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या़. सुदैवाने त्या कोणाला लागल्या नाहीत़. मात्र, त्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला होता़. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेने या घटनेचा शोध घेऊन या तरुणाला अटक केली आहे़. तेजस प्रकाश गोंधळे (वय २५, रा़ तेजदीप निवास, संकल्प सोसायटी, गोंधळेनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे़. ही घटना मुंढवा येथील हॉटेल नाईट रायडर येथे सोमवारी ६ आॅगस्टला मध्यरात्री एक ते सव्वाएकच्या दरम्यान घडली होती़. गोंधळे यांच्याकडून रिव्हॉल्व्हर, २ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत़. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार सुरेश सखाराम सोनवणे यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तेजस गोंधळे यांचा पाण्याचा टँकर व दोन रेशनची दुकाने आहेत़ त्यांच्या नातेवाईकांची हत्या झाल्याने त्यांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हरचा परवाना घेतला आहे़. रविवारी रात्री ते फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी आपल्या २ मैत्रिणी व ४ मित्रांसह हॉटेल नाईट रायडर येथे गेले होते़. जेवण झाल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास ते जाण्यासाठी निघाले़ तेव्हा त्यांच्या शेजारच्या टेबलवरील तरुणांनी काही कॉमेट पास केल्या़ .त्यावरुन गोंधळे यांचे मित्र चिडले, त्यांच्यात वादावादी झाली़ गोंधळे मित्राला सोडवायला गेले़. त्यांच्याशी वाद सुरु झाला़. तेव्हा त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हर काढून हवेत चार गोळ्या झाडल्या़. या गोळीबाराने हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला़. अनेक ग्राहक घाबरुन हॉटेल बाहेर पळून गेले़. या प्रकारानंतर सर्व जण निघून गेले़. त्यामुळे या घटनेची कोणतीही माहिती पोलिसांना दिली गेली नाही़ .गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना याची माहिती मिळाली़. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना चौकशी करण्यास सांगितले़. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी घटनास्थळाला भेट घेऊन माहिती घेतली़. हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले़. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तेजस गोंधळे यांना अटक केली़. हॉटेलवरही कारवाई करणारयाबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले, की हॉटेलमध्ये झालेल्या या प्रकाराची माहिती हॉटेलचालकाने पोलिसांना देणे बंधनकारक होते़. कोणताही गुन्हा घडत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळविणे नागरिकांचे कर्तव्य आहे़.त्यामुळे या हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे़. तेजस गोंधळे यांना स्वरंक्षणासाठी रिव्हॉल्व्हरचा परवाना दिला असतानाही त्यांनी त्यातील शर्तीचा भंग करुन हॉटेलमधील लोकांची सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य केल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलिसांनी पाठविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसFiringगोळीबार