फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन उत्साहात
By Admin | Updated: October 24, 2014 05:20 IST2014-10-24T05:20:48+5:302014-10-24T05:20:48+5:30
पारंपरिक उत्साहात पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात लक्ष्मीपूजनाचा सण साजरा करण्यात आला. गुरूवारी सायंकाळी ६.०९ च्या मुहूर्तावर देवींच्या मंदिरात आणि घराघरांत विधिवत पूजा केली

फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन उत्साहात
पिंपरी : पारंपरिक उत्साहात पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात लक्ष्मीपूजनाचा सण साजरा करण्यात आला. गुरूवारी सायंकाळी ६.०९ च्या मुहूर्तावर देवींच्या मंदिरात आणि घराघरांत विधिवत पूजा केली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यात व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष उत्साह दाखवला.
घराघरात चौरंगावर लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेऊन पूजन करण्यात आले. सुगड, चोपडी, धनपूजन करण्यात आले. केरसुणीची लक्ष्मी मानून पुजा केली. समई, पणती लावून देवीला वंदन करण्यात आले. प्रसाद म्हणून लाह्या, बत्ताशे, मिठाईचे वाटप करण्यात आले. शहरातील ठिकठिकाणच्या मंदिरात सोळा प्रकारे देवींची महापूजा करण्यात आली. तेथे नागरीकांनीही पुजेसाठी गर्दी केली होती. मंदिरातील आरती, घंटानादाबरोबरच बाहेर फटाक्यांची आतषबाजी होत होती. लहान मुलांनीही लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्याचा आनंद घेतला. विविध बाजारपेठांत खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती.(प्रतिनिधी)