महाळुंगे येथील रबर कंपनीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST2021-04-04T04:12:03+5:302021-04-04T04:12:03+5:30

अचानक कंपनीमध्ये आग लागल्याने आजूबाजूच्या नागरीवस्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तेथील सजग नागरिकांनी महाळुंगे पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी ...

Fire at rubber company at Mahalunge | महाळुंगे येथील रबर कंपनीला आग

महाळुंगे येथील रबर कंपनीला आग

अचानक कंपनीमध्ये आग लागल्याने आजूबाजूच्या नागरीवस्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तेथील सजग नागरिकांनी महाळुंगे पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आजूबाजूच्या नागरीवस्तीमधील तसेच तेथील जवळील हॉस्पिटलमधील नागरिकांना बाहेर काढले. पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती कळवली. अग्निशमन दल, एमआयडीसी अग्निशमन दल, महिंद्रा कंपनी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. गावातील नागरिकांनी देखील पाण्याचे टॅंकर आणून आग विझवण्यासाठी हातभार लावला. काही तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले मात्र तोपर्यंत कंपनीतील सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा माल आगीत जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

--

फोटो क्रमांक : ०३महाळुंगे रबर कंपनी

फोटो महाळुंगे येथे नागरीवस्तीत असलेल्या कंपनीला भीषण आग लागली

Web Title: Fire at rubber company at Mahalunge