पुण्यातील फिनिक्स मॉलच्या वाहनतळात आग
By Admin | Updated: March 15, 2017 23:45 IST2017-03-15T23:45:17+5:302017-03-15T23:45:17+5:30
अहमदनगर रस्त्यावरील विमाननगर चौकात असलेल्या फिनिक्स मॉलच्या वाहनतळात शार्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.

पुण्यातील फिनिक्स मॉलच्या वाहनतळात आग
ऑनलाइन लोकमत
चंदननगर, दि. 15 - अहमदनगर रस्त्यावरील विमाननगर चौकात असलेल्या फिनिक्स मॉलच्या वाहनतळात शार्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मॉलच्या वाहनतळातील पी-१ या मजल्यावर विद्युत साहित्य ठेवण्यात आलेले आहे. या साहित्याला आग लागली. येरवडा अग्निशामक दलाचा बंब साडेचार वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचला. काही मिनिटांतच आग आटोक्यात आणण्यात यश आले, अशी माहीती कर्मचारी सुनिल देवकर यांनी दिली.
दत्ता सातव, सुनिल पाटोळे,ज्योतीबा शिंदे, सुनिल धुमाळ यांनी आग आटोक्यात आणली.