न्हावरे येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:10 IST2021-04-24T04:10:54+5:302021-04-24T04:10:54+5:30

या घटनेत राजेंद्र नगरे यांचे शिवशंभो बॅटरी, तर महादेव नगरे यांचे कृष्णा टायर ही दोन दुकाने जळाली आहेत. ...

The fire at Nhavare burnt down two shops | न्हावरे येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

न्हावरे येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

या घटनेत राजेंद्र नगरे यांचे शिवशंभो बॅटरी, तर महादेव नगरे यांचे कृष्णा टायर ही दोन दुकाने जळाली आहेत. घटनेचा पंचनामा तलाठी माधव बिराजदार यांनी केला आहे. सध्या लाॅकडाऊनमुळे न्हावरे बाजारपेठ बंद असल्याने राजेंद्र नगरे यांच्या दुकानातून आगीच्या झळा व धूर नागरिकांना दिसल्याने त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारच्या महादेव नगरे यांच्या दुकानालाही आगीने वेढले. ही आग विझविण्यासाठी नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु आगीने क्षणार्धात दुकानातील सर्वच भाग व्यापून टाकला होता. दोन्ही दुकानातील सर्वच मालाचा अक्षरशः कोळसाच झाला आहे. नागरिकांनी वेळीच पाण्याच्या फवाऱ्यानी कसेबसे आगीवर नियंत्रण आणल्याने पुढील अनर्थ टळला. राजेंद्र नगरे यांचे सुमारे वीस लाख रुपयांचे तर महादेव नगरे यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही दुकानदार उघडयावर आल्याने शासनाच्या संबंधित विभागाने याची दक्षता घेऊन त्वरित त्यांना अर्थिक मदत करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी केली आहे.

न्हावरे (ता.शिरूर) येथे लागलेल्या आगीत दोन दुकानांची जळून खाक झाली आहे .

Web Title: The fire at Nhavare burnt down two shops