शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुणे- सोलापूर महामार्गावरील हॉटेल कांचनला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 17:20 IST

यवत येथील कांचन हॉटेलला लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

पुणे : पुणे- सोलापुर महामार्गावर यवत गाव येथे असणाऱ्या हॉटेल कांचनला आज (दि. १) दुपारी भीषण आग लागली. पीएमआरडीए, एमआयडीसी व दौंड येथील अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आत्ता कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.

पुणे सोलापूर महामार्गलगत असलेल्या यवत येथील प्रसिद्ध "कांचन व्हेज" हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मुख्य इमारतीमधील विविध साहित्य, वस्तू जळून खाक झाल्या. आज (दि.१) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान हॉटेलच्या गॅस ठेवलेल्या भागात आग लागली काही क्षणात हॉटेलची मुख्य इमारत व किचनमध्ये आग पसरली आगीत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले.

महामार्गालगत असलेल्या कांचन हॉटेल मध्ये आग लागल्याचे समजताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.स्थानिकांनी व हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र, आग आटोक्यात आली नाही.अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.मात्र अर्धा तास उलटल्यानंतर देखील अग्निशामक दल घटनास्थळी आले नव्हते.यामुळे आगीत अर्ध्या तासात संपूर्ण इमारती मधील लाकडी फर्निचरचे साहित्य व गवताळ भाग जाळून खाक झाला.

चार वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ येथील अद्योगिक वसाहत , दौंड नगरपरिषद व पीएमआरडीए चे अग्निशामक बंब दाखल झाले यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गॅस गळती झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक अंदाज घटनास्थळी व्यक्त केले जात होते.

यवत येथील कांचन हॉटेलच्या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता इतकी होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाडयांना पाचारण करावे लागले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. मात्र या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेfireआगFire Brigadeअग्निशमन दलhotelहॉटेल