शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पुण्यातील परफेक्ट बेकरीला आग; डिझेलवर चालणाऱ्या १३ भट्ट्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:16 IST

मीनाताई ठाकरे वसाहतीतील औद्योगिक भागातील परफेक्ट बेकरीला सोमवारी दुपारी १२च्या सुमारास डिझेलवर चालणाऱ्या भट्टयांना आग लागून त्या भस्मसात झाल्या

ठळक मुद्देएकूण १५ डिझेलवर चालणाऱ्या भट्टयांपैकी १३ आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक४० फुटी झाड आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे पडण्याचा धोका

महर्षी नगर : येथील मीनाताई ठाकरे वसाहतीतील औद्योगिक भागातील परफेक्ट बेकरीला सोमवारी दुपारी १२च्या सुमारास डिझेलवर चालणाऱ्या भट्टयांना आग लागून त्या भस्मसात झाल्या. यामध्ये एकूण १५ डिझेलवर चालणाऱ्या भट्टयांपैकी १३ आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच बेकरी मधील असलेले ४० फुटी झाड आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.परफेक्ट बेकरीला लागूनच दाट झोपडपट्टी असलेली मीनाताई ठाकरे वसाहत असून आग वसाहतीत पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. दोन वर्षांपूर्वी येथे अशीच आगीची दुर्घटना घडली. यात २० झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या व सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे या घटनेचा धसका घेऊन परफेक्ट बेकरीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर वसाहतीतील नागरिक घाबरून घराबाहेर पळाले. परंतु अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे बेकरीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कोंढवा, कात्रज व अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयातून पाच अग्निशामक दलाच्या  गाड्या व दोन पाण्याच्या टँकरच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.या दुर्घटनेत परफेक्ट बेकरीच्या १३ डिझेल भट्ट्यांबरोबरच पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

कारवाई का नाही?परफेक्ट बेकरीच्या विरूद्ध वसाहतीतील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा राजकीय वरदहस्तामुळे या बेकरीवर कारवाई होत नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. परफेक्ट बेकरीच्या आत कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना  राबवण्यात आल्याचे दिसून आले नाही. या बेकरीमध्ये जुन्या डिझेल टँकरच्या गाडीचा टँकर लावून त्यामध्ये अवैधरित्या डिझेल साठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास दिसून आले.

टॅग्स :fireआगPuneपुणे