शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत इलेक्ट्रॉनिक शोरूमला भीषण आग कोट्यावधी रूपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 20:24 IST

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर असणाऱ्या महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला रविवारी (दि. १२) सकाळी दहाच्या दरम्यान भीषण आग लागली.

बारामती : बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर असणाऱ्या महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला रविवारी (दि. १२) सकाळी दहाच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीमध्ये शोरूममधील सर्व साहित्य व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. सबंधीत शोरूम मालकाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत कोणतिही तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे आगीचे नेकमे कारण व नुकसान समजू शकले नाही. भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्यावर हे शोरुम असून सकाळी रस्त्यावरुन जाणाऱ्या काही नागरिकांना आतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत शोरूम मालकांना कळविण्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा झेपावू लागल्या व धुराचे लोट बाहेर पडू लागले होते. या शोरुममध्ये असलेले टीव्ही, रेफ्रिजेटर्स, एअरकंडीशनर्स, मायक्राेव्हेव ओवन, पंखे, मिक्सर, कूलर्स, म्युझिक सिस्टिम अशा अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. बारामती नगरपालिका, एमआयडीसीच्या अग्निशामक दलांनी आग तासाभराच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही. शोरुम व त्या मागे असलेल्या गोदामापर्यंत आग भडकलेली असल्याने नुकसानीची तीव्रता अधिक होती. साधनांचा अभाव असूनही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून ही आग आटोक्यात आणली. 

दरम्यान आगीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकारास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुभाष मुंडे यांनी विनाकारण धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला. याबाबत पत्रकारांनी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक मानसिंग खोचे यांना भेटून या घटनेचा निषेध नोंदविला.

टॅग्स :BaramatiबारामतीfireआगPuneपुणे