अल्फा फोम कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

By Admin | Updated: February 1, 2017 04:37 IST2017-02-01T04:37:23+5:302017-02-01T04:37:23+5:30

येथील औद्योगिक परिसरातील नाणेकरवाडीच्या हद्दीतील अल्फा फोम कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून चाळीस लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती ठाणे

Fire due to short circuit in Alpha Foam Company | अल्फा फोम कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

अल्फा फोम कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

चाकण : येथील औद्योगिक परिसरातील नाणेकरवाडीच्या हद्दीतील अल्फा फोम कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून चाळीस लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार अरुण लांडे यांनी दिली.
ही आग मंगळवारी (दि. ३१) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागली होती. याबाबत युवराज शिवाजी गुळवे (वय ३८, रा. कांची एन्क्लेव्ह, फ्लॅट नं. एम-१०४, चाकण, मूळ गाव - खामसवाडी, ता. जि. उस्मानाबाद) यांनी दिली आहे. अल्फा फोम कंपनीतील पत्र्याच्या स्क्रॅप यार्डजवळ आग लागली. या आगीत पाच मशिन, जनरेटर, स्क्रॅप सामान व पत्र्याचे शेड जळून भस्मसात झाले. कामगारांनी पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला पण आग विझली नाही. अखेर बजाज आॅटो व फोक्सवॅगन कंपनीच्या आगीच्या बंबांनी सायंकाळी
चार वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Fire due to short circuit in Alpha Foam Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.