कंपनीला आग

By Admin | Updated: November 14, 2016 02:56 IST2016-11-14T02:56:31+5:302016-11-14T02:56:31+5:30

कंपनीला आग

Fire to company | कंपनीला आग

कंपनीला आग

लोणावळा : नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील गाळा नं. ७० अ कान्टावाला अँड सन्स या कंपनीमध्ये रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. सुदैवाने या वेळी कंपनीमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, कंपनीमधील साहित्य मोठ्या प्रमाणात आगीत जळाल्याने नुकसान झाले आहे.
आग लागल्याची माहिती समजताच कंपनीचे व्यवस्थापक तसेच शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप थत्ते व औद्योगिक वसाहतीमधील उपस्थितांनी अग्निशमन दलास पाचारण करून वेळेत आग विझवली. लोणावळा नगर परिषदेचा अग्निशमन बंब वेळेत घटनास्थळी आल्याने आग भडकण्यापूर्वी विझविण्यात आली.
महिलेची आत्महत्या
पिंपरी : राहत्या घरी ओढणीच्या साह्याने एका महिलेने गळफ ास घेतला़ लवीना कन्हैयालाल तीर्थानी (वय २२, रा़ रिव्हर रोड, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे़
ही घटना रविवारी पावणेचारच्या सुमारास रिव्हर रोड पिंपरी येथे घडली़ या प्रकरणी नरेश तीर्थानी यांनी पोलिसांना माहिती दिली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लवीना हिने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने सिलिंग फॅ नला गळफ ास घेतला़
ही माहिती लवानी हिचे चुलते नरेश यांनी पिंपरी चौकी पोलिसांना दिले़ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली़ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केला़ अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Fire to company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.