कपड्याच्या दुकानाला आग

By Admin | Updated: January 10, 2017 03:41 IST2017-01-10T03:41:42+5:302017-01-10T03:41:42+5:30

येथील केसनंद फाटा परिसरामध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कपड्याच्या दुकानाला आग लागून जवळपास पाच हजार साड्या

Fire in the clothing store | कपड्याच्या दुकानाला आग

कपड्याच्या दुकानाला आग

वाघोली : येथील केसनंद फाटा परिसरामध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कपड्याच्या दुकानाला आग लागून जवळपास पाच हजार साड्या, ब्लँकेट व इतर कपडे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वाघोली येथील केसनंद फाटा परिसरामध्ये संतोष कलेक्शन नावाने दुकान आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या या दुकानाच्या मागच्या बाजूने धूर येत असल्याचे एका महिलेला दिसले. यानंतर तत्काळ दुकानमालक चंपालाल शेठीया यांना कळविण्यात आले. दुकान उघडून पाहिले असता मागच्या खोलीमध्ये आग लागली होती.
याबाबत अग्निशमन दलाला याची माहिती देऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. आगीमुळे इमारतीचा स्लॅब गरम झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानावरील रहिवाशांनी सिलिंडरसह इतर वस्तू घराच्या बाहेर काढल्या. अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्यानंतर तत्काळ आग आटोक्यात आणली. आग लागल्याचे वेळीच समजल्याने दुकानाचा मुख्य भाग आगीपासून वाचला. आग लागलेल्या खोलीमध्ये ठेवलेल्या साड्या, ब्लँकेट व इतर कपडे जळून खाक झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Fire in the clothing store