नारायणगावातील कापड दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST2021-07-17T04:10:47+5:302021-07-17T04:10:47+5:30

ही आग शॉर्टसर्किटने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत सर्व कापड दुकान खाक झाला आहे. संजय केवळचंद चोरडिया ...

Fire at a cloth shop in Narayangaon | नारायणगावातील कापड दुकानाला आग

नारायणगावातील कापड दुकानाला आग

ही आग शॉर्टसर्किटने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत सर्व कापड दुकान खाक झाला आहे.

संजय केवळचंद चोरडिया यांच्या मालकीचे असलेले संजय होजियरी हे होलसेल दुकान आहे. चोरडिया हे आज दुपारी तीनच्या सुमारास दुकान बंद करून बाहेरगावी गेले होते. सायंकाळी ५ .३० वा सुमारास अचानक आग लागल्याची माहिती स्थायिक नागरिकांनी चोरडिया यांना दिली. त्यामध्ये दुकानातील लहान मुलांचे कपडे, होजियरी अशा कापड माल आगीत जाळून खाक झाला आहे. याघटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतचे सरपंच योगेश पाटे यांनी जुन्नर अग्निशामक दलाची गाडी बोलविली.

यावेळी

सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी भेट दिली. आगीची माहिती कळताच गावातील व्यावसायिकानी आग विझविण्यासाठी जुन्नर अग्निशामक दल,स्थायिक तरुण, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. ही आग सुरु असताना चोरडिया कुटूंबाचे अश्रू अनावर झाले होते.

--

फोटो क्रमांक : १६ नारायणगाव होजिअरी कापड दुकानाला आग

फोटो ओळी : नारायणगाव येथील संजय होजियरी या कापड दुकानाला लागलेल्या आगीत दुकान खाक झाले

Web Title: Fire at a cloth shop in Narayangaon