शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Video: कात्रज बोगद्यानजीकच्या डोंगरावर वणवा पेटला; आग पसरण्याचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 23:36 IST

Fire at katraj tunnel: पुणे सातारा हायवेलगत मोठी आग लागली आहे. हायवे लगत शिंदेवाडी गावाजवळ असणाऱ्या गावात हा वणवा पेटला आहे. ही आग आणखी परसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. 

पुणे : पुणे सातारा महामार्गावरील कात्रज घाटावरील डोंगररांगेमध्ये बुधवारी रात्री वणवा लागला. वा-याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. याबाबत  माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले. तसेच पुणे महानगर विकास क्षेत्र प्राधिक रणाच्या अग्निशामक दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. परंतु, डोंगरांची उंची पाहता तिथपर्यंत वाहने पोचू शकली नाहीत. जवानांनी वनविभागाच्या मदतीने झाडांच्या फांद्या तोडून ही आग विझविण्याचा प्रयत्न चालवला होता. (fire broke out at katraj tunnel.)वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साधारणपणे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान कात्रज घाटातील बोगद्याच्या वरच्या डोंगरांमध्ये आग लागली. सध्या डोंगरांवरील गवत आणि झाडोरा वाळलेला असल्याने घर्षणामुळे आग लागू शकते असे सांगण्यात आले. ही आग रात्रीच्या अंधारात लांबूनही दिसत होती. वा-याचा वेग अधिक असल्याने झपाट्याने आग पसरत चालली होती. याबाबत काही नागरिकांनी छायाचित्रे आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करुन सोशल मीडियावर पाठवले. याबाबत वनविभागाला माहिती समजताच उप वन संरक्षक राहुल पाटील यांनी संबंधित क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी रवाना केले. दरम्यान, हे क्षेत्र खासगी मालकी क्षेत्र असल्याचे तसेच ते वन क्षेत्र नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. ही हद्द पीएमआरडीएची असल्याने त्यांनाही माहिती कळविण्यात आली. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दोन बंबांसह 15 जवान घटनास्थळी रवाना केले. डोंगराच्या खाली उभ्या करण्यात आलेली ही वाहने वर जाऊ शकली नाहीत. तसेच, या वाहनांमधील पाण्याचे पाईपही वरपर्यंत नेता आले नाहीत.वन विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने अग्निशामक दलाचे जवान डोंगर चढत वर गेले. झाडांच्या आणि झुडपांच्या ओल्या फांद्या तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. आग वेगाने पसरत चालल्याने आणखी मनुष्यबळ मागविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याची ही कसरत सुरु होती. हे क्षेत्र वन विभागाचे होते की नव्हते, या आगीमध्ये वन्य जीव होरपळले आहेत काय हे रात्रीच्या अंधारात समजत नव्हते. आग विझल्यानंतर दिवसाउजेडीच याबाबत समजू शकेल असे अग्निशामन अधिकारी सुजीत पाटील यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :katrajकात्रजfireआग