शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:27 IST

पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीत मध्यरात्री लागलेल्या अागीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने नियंत्रण मिळवले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला.

पुणे : मध्यरात्रीची 3 वाजताची वेळ. अग्निशमन दलाला अाग लागल्याचा फाेन येताे. अवघ्या दाेनच मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाेहचतात. चिंचाेळ्या गल्ल्यांमुळे फायर गाडी अात जाऊ शकत नाही. जवान शर्थिचे प्रयत्न करुन अाग विझविण्याचा प्रयत्न करतात. आणि काेणालाही इजा हाेऊ न देता अवघ्या 15 मिनिटात अागीवर नियंत्रण मिळवतात. ही घटना अाहे काल मध्यरात्री पुण्यातील पाटील इस्टेट झाेपडपट्टी भागात घडलेली.     साेमवारी रात्री 3 च्या सुमारास पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीतील एका घराला अाग लागली. 10 बाय 12 च्या खाेलीला लाकडी बांधकाम असल्याने अागीने राैद्र रुप धारण केले हाेते. लांबून अागीचे भले माेठे लाेट नजरेस पडत हाेते. संपूर्ण शहर गाढ झाेपेत असताना अग्निशमन दलाचे जवान अाग विझवत हाेते. पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीत चिंचाेळ्या गल्ल्या अाहेत. त्यातून एकावेळी एकच माणूस जाईल इतकीच जागा अाहे. अाग लागलेले घर हे एका गल्लीच्या बरेच अात हाेते. तिथपर्यंत फायर गाडी जाने अशक्य हाेते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत माेठ्या पाईपच्या माध्यमातून पाण्याचा मारा सुरु केला. घराला लागलेल्या अागीमुळे घराच्या बाजूच्या व समाेरच्या घराला देखील अागीची झळ पाेहचली. अवघ्या 15 मिनिटाच्या अात अागीवर नियंत्रण मिळवण्यात अाले. दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्र तसेच कसबा अग्निशमन केंद्राच्या जवानांच्या मदतीने ही अाग विझवण्यात अाली. अागीचे राैद्र रुप पाहता खबरदारी म्हणून अाणखी दाेन फायर गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात अाल्या हाेत्या. या अागीत कुठलिही जीवित हानी झाली नाही. 

    याबाबत बाेलताना दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्राचे स्टेशन अाॅफिसर विजय भिलारे म्हणाले, रात्री 3 वाजून 8 मिनिटांनी अाग लागल्याचा फाेन अाला. अवघ्या दाेनच मिनिटात अाम्ही घटनास्थळी दाखल झालाे. अागीचे राैद्र रुप पाहून अाम्ही जादा कुमक मागवून घेतली. या भागातील चिंचाेळ्या गल्ल्यांमुळे अाग विझविण्यास काहीशी अडचण अाली. परंतु अामच्या जवानांनी जिवाची बाजी लावून अागीवर नियंत्रण मिळवले. या ठिकाणी घराला लागून घर असल्याने अाग माेठ्याप्रमाणावर पसरण्याचा धाेका हाेता. परंतु अामच्या जवानांच्या तत्परतेमुळे माेठा अनर्थ टळला.

   ही कामगिरी विजय भिलारे यांच्याबराेबर विकास शितापकर, कमलेश चाैधरी, अरुण गायकर, जयेश गाताडे, अरगडे, करिम पठाण, विष्णु जाधव अादी जवाननांनी पार पाडली. 

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलfireआगPuneपुणे