शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

कालव्यात बुडणा-या महिलेला अग्निशामक दलाच्या जवानाने वाचवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 20:09 IST

कालव्यामधून जनता वसाहतमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिले.

पुणे : जनता वसाहत येथील कालव्यात बुडत असलेल्या एका महिलेस अग्निशमन दलाच्या जवानाने जीवाची बाजी लावून वाचवले. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. कालव्यामधून जनता वसाहतमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिले. त्याचवेळी नागरिकांनी जनता वसाहत येथे नुकत्याच सुरू झालेल्या अग्निशमन केंद्रातील जवान विनायक माळी यांना याबाबत वर्दी दिली. जवान माळी यांनी त्यांचे सहकारी जवान सचिन आवाळे यांना सांगताच आवाळे यांनी क्षणाचा ही विलंब न करता अंगावरील गणवेश उतरवून लगेचच पाण्यात उडी मारली. त्यांनी कालव्यात उडी मारताच सदर महिलेचे अंतर पाहून त्यांनी शिताफीने तेवढे अंतर पार केले व बुडणा-या महिलेला बाहेर काढले. महिलेला प्राथमिक उपचार दिल्यानंतर शासकीय रुग्णवाहिका बोलावून दवाखान्यात रवाना केले. सदर महिलेने नेमकी कशामुळे उडी मारली अथवा नेमके काय घडले याचा अधिक माहिती समजू शकली नाही. जवान आवाळे यांनी केलेल्या या कामगिरीने तेथील स्थानिक ही अवाक होत पाहतच राहिले. आवाळे हे गेल्या सहा वषापार्सून  पुणे अग्निशमन दलामधे कार्यरत असून त्यांनी दिवाळीमधे देखील अशीच कामगिरी करत एका पुरुष व महिलेला जिंवत बाहेर काढले होते.   

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलWomenमहिला