फायर ऑडिटकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: December 12, 2014 00:03 IST2014-12-12T00:03:03+5:302014-12-12T00:03:03+5:30
महाविद्यालयांना फायर ऑडिट सक्तीचे असल्याने त्याबाबतची माहिती पाठविण्याचे आदेश देणा:या सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठानेच फायर ऑडिट करून घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.
फायर ऑडिटकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष
पुणो : महाविद्यालयांना फायर ऑडिट सक्तीचे असल्याने त्याबाबतची माहिती पाठविण्याचे आदेश देणा:या सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठानेच फायर ऑडिट करून घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठाच्या जुन्या इमारतींचे फायर ऑडिट झालेले नाही.
विधानपरिषदेत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या फायर ऑडिटबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. फायर ऑडिट सक्तीचे असून, अनेक महाविद्यालयांनी अद्याप ते केले नाही. त्यामुळे विद्यापीठांनी संबंधित महाविद्यालयांवर कोणती कारवाई केली, असा सवाल विधानपरिषद सदस्यांकडून विचारण्यात आला. त्यानंतर सर्व महाविद्यालयांनी ऑडिटबाबतची माहिती विद्यापीठाला तत्काळ कळवावी, अशा सूचना विद्यापीठातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न सुमारे 650 पैकी 239 महाविद्यालयांनीच फायर ऑडिट केले आहे.
अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘‘पुण्यातील पालिकेच्या तसेच खासगी शाळांनीही फायर ऑडिट करून घेणो अपेक्षित होते. परंतु, शिक्षण मंडळाने अद्याप पालिकेच्या शाळांचे ऑडिट करून घेतले नाही. या उलट शहरातील खासगी शाळांनी फायर ऑडिट करून घेतले आहे. सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांबरोबरच विद्यापीठाने स्वत: फायर ऑडिट करून घेणो गरजेचे आहे, असे स्पष्ट करून प्रशांत रणपिसे म्हणाले, अग्निशमन दलातर्फे विद्यापीठाला यासंदर्भातील पत्र पाठवून फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना दिल्या जातील.
विद्यापीठाने सर्व नवीन इमारतींचे फायर ऑडिट करून घेतले असून परिसरातील सर्व इमारतींमध्ये अग्निशामक यंत्र बसविण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठाने स्वत:च्या पातळीवर इमारतींचे फायर ऑडिट करून घेतले आहे. जुन्या इमारतींचे फायर ऑडिट करून घेण्याची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने सुरू केली आहे.
- डॉ. नरेंद्र कडू, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ