ससून रुग्णालयातील आग आटोक्यात; रुग्ण सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:00 PM2024-02-09T21:00:16+5:302024-02-09T21:00:27+5:30

आज दिनांक ०९•०२•२०२४ रोजी राञी ०८•१० वाजता ससून रुग्णालयात आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून एक व नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

Fire at Sassoon Hospital under control Patient safety | ससून रुग्णालयातील आग आटोक्यात; रुग्ण सुरक्षित

ससून रुग्णालयातील आग आटोक्यात; रुग्ण सुरक्षित

पुणे - आज दिनांक ०९•०२•२०२४ रोजी राञी ०८•१० वाजता ससून रुग्णालयात आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून एक व नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. ससून रुग्णालयातील नवीन इमारतीत दहाव्या मजल्यावर आग असल्याचे समजताच जवानांनी वर धाव घेतली असता, तिथे वार्डमधील शौचालयामागे असणाऱ्या डक्टमधे आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. रुग्णालयातील सुरक्षारक्षक यांनी तातडीने अग्निरोधक उपकरण वापरुन आग आटोक्यात आणल्याने मोठा धोका टळला होता. वार्डमधील रुग्णदेखील सुखरुप आहेत. आग पुर्ण विझली असून पुर्ण धोका दुर झाला असून जखमी वा जिवितहानी नाही. आगीचे कारण अंदाजे शौचालयात कोणी धुम्रपान केल्याने आग लागली असावी.

अग्निशमन दल जनजागृतीपर घेत असलेले मॉकड्रील याचा मोठ्या स्वरूपात उपयोग होतो हे या घटनेमुळे समजते.

Web Title: Fire at Sassoon Hospital under control Patient safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.