शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 20:43 IST

गॅपमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुराणा, मुथा व भन्साळी कन्स्ट्रक्शनच्या सुपरवाझर आणि ठेकेदारावर कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : सातव्या मजल्याच्या गॅलरीमधील रेलिंगच्या काढलेल्या काचांच्या गॅपमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुराणा, मुथा व भन्साळी कन्स्ट्रक्शनच्या सुपरवाझर आणि ठेकेदारावर कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.संतोष शर्मा (साईड सुपरवायझर), सुनील काळे व दिनेशकुमार यादव ( ठेकेदार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. रविवारी सातव्या मजल्याच्या बाल्कनीमधून खाली पडल्याने अडीच वर्षाच्या मिती मनिशकुमार जैन या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिचे वडील मनीष जैन यांनी दिलेल्या फियादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील शांतीनगर सोसायटीचे बांधकाम पुण्यातील प्रसिद्ध सुराणा, मुथा व भन्साळी या बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे. मात्र बांधकाम व्यवसायिकांनी बिल्डिंगच्या रेलिंगच्या काचांना सेफ्टी फिल्म बसविण्याचे काम सांगताना योग्य त्या सूचना दिल्या नाहीत.सुपरवायझर आणि ठेकेदार काळे व यादव यांनी फिर्यादीच्या सातव्या मजल्यावरील फ्लँटच्या गँलरीमध्ये असलेल्या रेलिंगच्या काचा दुरूस्तीसाठी काढून ठेवल्या. त्याठिकाणी सुरक्षेसाठी प्लायवुड किंवा पत्रा लावणे अथवा सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक होते मात्र तसे न केल्याने अडीच वर्षीय मिती ही खेळत असताना सातव्या मजल्यावरून खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसानी तपासाअंती सुपरवाझर आणि ठेकेदारावर सोमवारीगुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा