शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कागदी फायली संपुष्टात आणा : शैलेश गांधी; संजय शिरोडकर यांना माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:39 IST

सजग नागरिक मंचच्या वतीने दिला जाणारा सजग माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार संजय शिरोडकर यांना शैलेश गांधी यांच्या हस्ते देण्यात आला.

ठळक मुद्देशासकीय कार्यालयांमध्ये फायलींना आॅनलाइन मंजुरी देण्याची यंत्रणा विकसित व्हावी : शैलेश गांधीमाहिती अधिकार कायद्यामुळे मला एकदाही लाच द्यावी लागली नाही : संजय शिरोडकर

पुणे : शासकीय व्यवहारांमध्ये कागदी फायली या भ्रष्टाचाराच्या मूळ ठरत आहेत. टेबलांवर फायली रखडवून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये फायलींना आॅनलाइन मंजुरी देण्याची यंत्रणा विकसित केली पाहिजे. त्याद्वारे कागदी फायलींचे अस्तित्वच संपुष्टात आणावे असे मत माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी रविवारी व्यक्त केले.सजग नागरिक मंचच्या वतीने दिला जाणारा सजग माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार संजय शिरोडकर यांना शैलेश गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी, विश्वास सहस्रबुद्धे उपस्थित होते. माहिती अधिकाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला.शैलेश गांधी म्हणाले, ‘‘फाइल मिळत नाही असे सांगून लाच मागितली जाते. लाच दिल्यानंतर मात्र ती फाइल लगेच मिळते. त्यामुळे या फायलींचा राज संपविण्याची गरज आहे. आॅनलाइनच्या युगात आता इंटरनेटच्या माध्यमातून फायलींचे हस्तांतरण करता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे फायली तयार करण्यासाठी व त्या सांभाळण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आपण वाचवू शकू. पदावर बसणाऱ्या व्यक्तीपेक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा होणे जास्त गरजेचे आहे. ’’जगातील सर्वश्रेष्ठ कायद्यांपैकी माहिती अधिकार हा एक कायदा आहे. मात्र कायद्यामध्ये सुधारणा करून हा कायदा बोथट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहिती अधिकाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, असे गांधी यांनी सांगितले.संजय शिरोडकर म्हणाले, ‘‘माहिती अधिकार कायद्यामुळे मला एकदाही लाच द्यावी लागली नाही. आपण केंद्र व राज्य शासनाकडे ४० ते ५० लाख कोटी रुपये करापोटी जमा करतो. त्या पैशाचे काय होते, हे विचारण्याचा अधिकार प्रत्येक सामान्य नागरिकाला आहे.  जुगल राठी यांनी संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकाराच्या क्षेत्रात केलेल्या कामाची ओळख करून दिली. त्यांनी गेल्या १२ वर्षांत ५ हजार आरटीआय अर्ज केल्याचे राठी यांनी सांगितले.   

माहिती संकेतस्थळावर टाकणे बंधनकारकशासकीय कार्यालयांकडून माहिती अधिकारांतर्गत नागरिकांना जी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, ती सर्व माहिती संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. त्याबाबत शासनाने परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे. मात्र तरीही अनेक कार्यालये त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर जाहीर करत नसल्याचे वेलणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sajag Nagrik Manchसजग नागरिक मंचVivek Velankarविवेक वेलणकरPuneपुणे