शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याने २५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:58 IST

दहा झाडे लावण्याची शिक्षा : वन विभागाने केली होती कारवाई

ठळक मुद्दे देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करणे, भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे उल्लंघनआरोपीला २५ हजार रुपये दंड व आठ फुटी उंचीची दहा झाडे लावण्याची शिक्षा

लोणावळा : खंडाळ्यातील एका रिसॉर्टमध्ये देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवला होता. याची माहिती वन विभागाला कळताच त्यांनी तत्काळ याची दखल घेत एकावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वनरक्षक गणेश झिरपे यांनी फिर्याद दिली आहे.वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पी. टी. गिरिमोहन असे आरोपीचे नाव असून आरोपीने स्वत:च्या खंडाळा मिस्टिका रिसॉर्टमध्ये एक देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवला होता. ही माहिती वन विभागास कळताच वन विभागाने सदर रिसॉर्टमध्ये छापा टाकून पिंजरा व पोपट ताब्यात घेतला.  सदर गुन्ह्याबाबत आरोपीवर गुन्हा नोंदवला होता. २०१८ मध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्याबाबत आरोपी पी. टी. गिरिमोहन याच्यावर वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. मुळीक यांनी आरोपीला २५ हजार रुपये दंड व आठ फुटी उंचीची दहा झाडे लावण्याची शिक्षा सुनावली.सदर गुन्ह्याचा तपास वनपाल एम. व्ही. सपकाळे यांनी केला आहे. वन्य प्राण्यांना अशाप्रकारे बंदी बनविल्याच्या घटना कोठे घडत असल्यास सदर गुन्ह्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन मावळ वासीयांना वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी केले आहे. देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करणे, भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय