पूर्व हवेलीतील नागरिकांकडून२१ हजार ६०० रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:11 IST2021-04-20T04:11:15+5:302021-04-20T04:11:15+5:30
या दोन दिवसांत ब्रेक द चेन नियमावलींचे पालन करून आरोग्य सुविधा व अत्यावश्यक सेवा वगळता बाजार पेठेतील जीवनावश्यक आणी ...

पूर्व हवेलीतील नागरिकांकडून२१ हजार ६०० रुपये दंड वसूल
या दोन दिवसांत ब्रेक द चेन नियमावलींचे पालन करून आरोग्य सुविधा व अत्यावश्यक सेवा वगळता बाजार पेठेतील जीवनावश्यक आणी इतर व्यवहार पूर्णपणे बंद होते. दुधाची दुकाने व डेअरी ठरवून दिलेल्या वेळेतच बंद करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन दिवसांत विनामास्क व गरज नसताना घराबाहेर पडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून लोणी काळभोर पोलीसांनी ४९ केसेसमध्ये २१ हजार ६०० रुपयेची दंडात्मक कारवाई केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुर्व हवेलीत प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले आहेत.इतर दिवशी कायम गजबजणारा गावे तसेच पुणे -सोलापूर महामार्ग परिसर या दोन दिवसांत निर्मनुष्य दिसत होता.