शिक्षकांनी काढली विद्यार्थिनींची अश्लील छायाचित्रे

By Admin | Updated: December 20, 2015 02:35 IST2015-12-20T02:35:48+5:302015-12-20T02:35:48+5:30

सहलीसाठी नेलेल्या विद्यार्थिनींची अश्लील छायाचित्रे शिक्षकांनीच काढल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला. सोशल मीडियावर हे फोटो अपलोड झाल्यावर हा प्रकार पालकांना

Fine photographs of students removed by teachers | शिक्षकांनी काढली विद्यार्थिनींची अश्लील छायाचित्रे

शिक्षकांनी काढली विद्यार्थिनींची अश्लील छायाचित्रे

बारामती : सहलीसाठी नेलेल्या विद्यार्थिनींची अश्लील छायाचित्रे शिक्षकांनीच काढल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला. सोशल मीडियावर हे फोटो अपलोड झाल्यावर हा प्रकार पालकांना समजला. संबंधित शिक्षकांना निलंबित न केल्यास सोमवारपासून शाळा बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
काऱ्हाटी (ता. बारामती) येथील एका शाळेतील विद्यार्थी तीन दिवसांच्या सहलीसाठी कोकणात गेले होते. सहलीदरम्यान गणपतीपुळे येथे मुली समुद्रात पोहून बाहेर येताना त्यांची छायाचित्रे शिक्षकांनी टिपली. शनिवारी त्यातील काही फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले. त्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेतली तेव्हा तिन्ही शिक्षकांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतले. मुख्याध्यापकांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या शिक्षकांनी मद्यपान केले होते.

Web Title: Fine photographs of students removed by teachers