शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसांत संपण्याची चिन्हे          

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 20:51 IST

काँग्रेस पक्षाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसात संपण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसची शुक्रवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठकस्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आयात उमेदवारांना केला तीव्र विरोध

पुणे : काँग्रेस पक्षाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसांत संपण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नेत्यांमधूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत याविषयी झालेल्या बैठकीत या नावांवर अंतिम चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या नावाची उत्सुकता निर्माण झाली आहे.राज्यात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या लोकसभा मतदारसंघापैकी १७ ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यासह सात मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. पुण्यामध्ये काही दिवसांपुर्वी भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे व प्रविण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. पण स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आयात उमेदवारांना तीव्र विरोध केला. त्यामुळे ही नावे मागे पडली. आता काँग्रेस नेतृत्वाने स्थानिक नेत्यांनाच प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. शहरातून माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अ?ॅड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.मागील काही दिवसांपासून नवी दिल्लीत उमेदवारीवरून खल सुरू असला तरी अद्याप तिढा सुटलेला नाही. त्यामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दिल्लीत शुक्रवारच्या बैठकीत सायंकाळपर्यंत नाव निश्चित होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यासाठी पुण्यातून जोशी, छाजेड व शिंदे हे तिघेही दिल्लीत ठाण मांडून असल्याचे समजते. पण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उशिरा दाखल झाल्याने ही बैठक लांबली. रात्री उशिरा ही बैठक झाल्याचे समजते. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल व अन्य काही वरिष्ठ नेतेमंडळी बैठकीला हजर होते. या बैठकीत पुण्यातील उमेदवाराचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. पण कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार, हे काँग्रेसच्या उमेदवारांच्या अधिकृत यादीतूनच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक