शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

मुंबईत येण्यापूर्वी तोडगा काढा, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जरांगे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 07:03 IST

मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवे आहे, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी मांडली.  

लोणावळा : आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. चर्चेला तयार आहोत. मात्र, चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावे. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही, तसा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देतो, मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवे आहे, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी मांडली.  मी उपोषण हे आझाद मैदानावरच करणार आहे. मुंबईत कोणतीही गडबड, गोंधळ होणार नाही, याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो. आमची व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी. 

सरकार सकारात्मक आहे, आंदोलन थांबवा; मुख्यमंत्री शिंदे सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. पण, सरकार सकारात्मक आहे. तमाम मराठा समाजाला आवाहन आहे, सरकार तुमचेच आहे. मराठा समाजाला सोयीसुविधा देण्याबाबत सरकार हात आखडता घेणार नाही.  इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.

जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते : आंबेडकरमनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण न करता पंगतीत जेवण करावे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे