लायन्स क्लबतर्फे कलाकारांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST2021-07-14T04:12:22+5:302021-07-14T04:12:22+5:30
या उपक्रमास उद्योजक माजी प्रांतपाल लायन दीपक शहा यांनी त्यांच्या प्रतिभा ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटतर्फे एक लाख रुपये सुपूर्द केले. ...

लायन्स क्लबतर्फे कलाकारांना आर्थिक मदत
या उपक्रमास उद्योजक माजी प्रांतपाल लायन दीपक शहा यांनी त्यांच्या प्रतिभा ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटतर्फे एक लाख रुपये सुपूर्द केले. ज्येष्ठ अभिनेता मिलिंद दास्ताने आणि लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन हेमंत नाईक यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाट्य परिषद पुणे शाखाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, रजनी भट, विद्या भागवत, मंजूश्री जोशी, अंजली जाखडे, भारती गोसावी, वर्ष संगमनेरकर, राजू जावळकर, चेतन चावडा, शाहीर दादा पासलकर, बाळू निकाळजे, जितेंद्र वाईकर, नयन महाजन, पूनम कुडाळकर, अर्चना जावळेकर, कुमार पाटोळे इत्यादी कलाकारांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले.
या प्रसंगी लायन रितू नाईक, माजी प्रांतपाल दीपकभाई शाह, इतर पदाधिकारी प्रमिला वाळुंज, राजश्री शाह, लायन्स क्लब तळेगाव चे अध्यक्ष दीपक बाळसराफ, प्रकल्प अधिकारी लायन बलविंदर सिंह राणा व लायन तेजश्री अडीगे तसेच पुणे नाट्य परिषदे कोषाध्यक्ष शशिकांत कोठावळे, बालगंधर्व परिवार उपाध्यक्ष योगेश देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.
-----------------------------