शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गुन्हे शाखेने मागविली डीएसकेंच्या सर्व मालमत्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 22:51 IST

पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरु असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

पुणे - पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरु असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.  ही माहिती आपण दोन दिवसात देऊ, असे आश्वासन डी़. एस. कुलकर्णी यांनी पोलिसांना दिले आहे.

ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोंबर २०१७ रोजी कुलकर्णी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाने त्यांना ५० कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे. परंतु, गेल्या महिन्याभरापासून ते पैसे भरण्यास कुलकर्णी यांना अपयश आले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेत दररोज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कुलकर्णी दाम्पत्य बुधवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहिले होते़ गुरुवारीही त्यांची दोन टप्प्यात चौकशी करण्यात आली.

या चौकशीत त्यांच्याकडे विविध मुद्द्यावर माहिती मागण्यात आली आहे.  बांधकाम व्यावसाया व्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवसाय करता़ सध्या करीत असलेल्या सर्व व्यवसायाची कागदपत्रे, भारतात कोणकोणते बांधकाम प्रोजेक्ट अपूर्ण अवस्थेत आहेत. परदेशातील बांधकाम प्रकल्प, विविध व्यवसायामध्ये परिवारातील कोणकोणत्या व्यक्ती मदत करतात़ निधी कोठून मिळवला़ कायमस्वरुपी व तात्पुरता स्टाफ किती़ सर्वांकडे मिळून किती वाहने आहेत . पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या नावे महाराष्ट्र बँक, बाजीराव रोड शाखेतील २ खात्यांची माहिती, २००७ पासून डीएसके ग्रुप कंपन्या, संचालकाचे सर्व पॅन क्रमांक, विवरण पत्रे, कुटुंबातील सर्व सदस्य व संचालकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डची यादी, ग्रुपमधील सदस्य, संचालकांच्या ट्रस्टची कागदपत्रे, आयकर विवरण पत्रे, ज्या कंपनी, फर्ममध्ये भागीदार आहात त्या कंपनीमधून आपण आपल्या वैयक्तिक खर्चासाठी किती रक्कम काढली़ त्याचा तपशील, आपल्या पत्नीने वैयक्तिक कारणासाठी कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतली त्याची कागदपत्रे, बँक आॅफ बडोदा, जळगाव जनता सहकारी बँकेकडून पत्नीने किती कर्ज कशासाठी घेतले व कोठे वापरले याची माहिती, आपल्या अथवा आपल्या कुटुंबाच्या नावे विमा कंपनीमध्ये किती रक्कमेची विमा, ठेव, गुंतवणुक केलेली आहे़ तसेच म्युचअल फंड व शेअर्सच्या कोणत्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणुक असा सर्व तपशील देण्याची मागणी पोलिसांनी कुलकर्णी यांच्याकडे केली असून दोन दिवसात ही माहिती देतो, असे त्यांनी पोलिसांना आश्वासन दिले आहे. 

हेमंती कुलकर्णी यांचा ७ कोटींचा विमा

हेमंती कुलकर्णी यांच्या नावे ७़२० कोटी रुपयांचा विमा व म्युचअल फंड असून १़१८ कोटी रुपयांचे शेअर्स, विद्या सहकारी बँक, अनल्स प्रॉपटीज अँड इंडस्ट्रीजचे शेअर्स घेतले आहे़ त्याबाबतची कागदपत्रे मागण्यात आली आहे़ हेमंती कुलकर्णी यांना मिळत असलेल्या मालमत्तेच्या भाडेबाबतची कागदपत्रे मागण्यात आली आहे.

डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या टम्प्स टॉवरमधील फ्लॅटबाबत बरीच चर्चा झाली आहे़ पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्यांचे लग्न कधी, कोठे तसेच लग्नात किती खर्च केला आहे. या खर्चासाठी आपण रक्कम कशी उभी केली, याचीही कागदपत्रे मागण्यात आली आहे. 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे