अखेर ज्वेलरी हॉलमार्किंग कायद्याची अंमलबजावणीबाबत तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:12+5:302021-06-18T04:08:12+5:30

सोमेश्वरनगर : मंगळवार, दि. १५ जून रात्री उशिरापर्यंत केंद्रीय उद्योग व ग्राहक व्यापार मंत्री पियूश गोयल यांच्या ...

Finally a settlement on the implementation of the Jewelery Hallmarking Act | अखेर ज्वेलरी हॉलमार्किंग कायद्याची अंमलबजावणीबाबत तोडगा

अखेर ज्वेलरी हॉलमार्किंग कायद्याची अंमलबजावणीबाबत तोडगा

सोमेश्वरनगर : मंगळवार, दि. १५ जून रात्री उशिरापर्यंत केंद्रीय उद्योग व ग्राहक व्यापार मंत्री पियूश गोयल यांच्या बरोबर ‘इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन’ व इतर सराफ संघटनांच्या प्रतिनिधीशी झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आहे. पूर्वीच्या कायद्यात काही बदल करून आजपासून देशभरात ज्वेलरी वरील हॉलमार्किंग कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असल्याचे केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केले व तसा आदेश दिला. याबाबतची माहिती ‘इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली.

केंद्रसरकारने सोने-चांदीच्या व्यवसायात अधिक पारदर्शीपणा यावा म्हणून हॉलमार्क कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून होणार होती. मात्र, व्यापारीवर्गाने हॉलमार्क सेंटर सर्वत्र उपलबध नसल्याची अडचण सरकारला दाखवून दिली. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर जुना माल तत्काळ हॉलमार्क करणे अशक्य असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे मंत्रालयाने १ सप्टेंबरपर्यंत जुना स्टॉक हॉलमार्क करण्यास मुदत दिली आहे. तत्पूर्वी कोणताही अधिकारी सोन्याच्या दुकानात संबंधित तपासासाठी जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या देशभरात ९४० हॉलमार्किंग सेंटर आहेत. वर्षातील ३०० दिवसात जवळपास १४ कोटी दागीने हॉलमार्क होऊ शकतात अशी माहिती ईंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे पश्चिम भारताचे प्रमुख विजय लष्करे यांनी दिली.

उद्योग व ग्राहक मंत्रालयाने चर्चेत सकारात्मक तोडगा काढल्याने देशभरातील फक्त हॉलमार्क सेंटर असलेल्या २५६ जिल्ह्यांत हॉलमार्किंग लागू होणार आहे. चाळीस लाखांच्या आतील वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापारी वर्गाला सक्ती केली नाही. तसेच २०,२३ व २४ कॅरेटच्या हॉलमार्किंगला मान्यता दिली. १०० वर्षापूर्र्वीची राष्ट्रीय संस्था असलेल्या ईंडियन बुलियन ज्वेलर्सचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता व सहकारी वर्गानी आपली अडचण पद्धतशीर व सनदशीर मार्गाने मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे देशभरातल्या व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे असे मत ‘ईब्जा’ ( ईंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन) चे महाराष्ट्र राज्य समन्वयक व बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यानी व्यक्त केले. बारामतीला सोने-चांदीच्या शुद्धतेची परंपरा आहे, त्याचप्रमाणे २३ व २४ कॅरेटचे दागिने ईथे असतात. त्यामुळे बारामतीच्या व्यापाराला विशेष फायदा होईल, असेही मत आळंदीकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Finally a settlement on the implementation of the Jewelery Hallmarking Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.